औरंगाबाद : टेम्पो आडवून दीड लाख रुपये पळवणाऱ्या दरोडेखोराच्या टोळीचा छडा लावण्यात ग्रामिण पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे टेम्पोचालकानेच दरोडेखोरांशी हातमिळवणी करुन दीड लाख रुपये पळवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तीघांना अटक करुन ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रकाश ढोले (रा. रास्ते सुरेगांव, ता. येवला) हा महिंद्रा पिकअप व्हॅनचा (क्र. एमएच-१७-बीडी-३०९५) चालक आहे. त्याने राहता येथील ईलेक्ट्रीक साहित्यांचे व्यापारी जितेन पटेल यांच्या इलेक्ट्रीक आँर्डरप्रमाणे इलेक्ट्रीक मोटारी बुलढाणा येथे पोहचवण्यासाठी २० जुलै रोजी चालक प्रकाश ढोले व श्री. पटेल यांचा साला रवीशेठ हे असे दोघेजण गेले होते.
बुलढाणा येथे माल देऊन परत येताना रात्री आठ वाजेच्या सुमारास वैजापूर मार्गे राहता जाताना लाल रंगाच्या दुचाकीवरून तीघेजण आले. टेम्पोच्या समोर दुचाकी आडवी लावत तुम्ही अपघात करुन आले असे दरडावत रवी यांच्याजवळील दीड लाख रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढला. ग्रामिण पोलिसांनी चालक ढोले व रवि यांची वेगवेगळी चौकशी केली. ढोले हा काहीतरी लपवत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने दरोड्याची कबुली दिली. यातील मुख्य फरार आरोपी सुनील रहाणे याने ढोलेला मोठे भाडे घेऊन जाताना सांग तुलाही वाटा देईल असे अमिष दाखवले होते. त्यामुळे ढोले याने दिलेल्या माहीतीवरुन हा दरोडा टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी ढोलेसह त्याचे साथीदार संदीप राजपूत (रा. दत्तनगर, शिर्डी), अमोल मकासरे (रा. पानमळा, शिर्डी) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून रोख ३७ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेले मोबाईल असा अद्याप मुख्य आरोपी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधिक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक भागवत फुंदे, उपनिरिक्षक संदीप सोळंके, भगतसिंग दुलत, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, रमेश अपसनवाड, वाल्मीक निकम, योगेश तरमाळे, ज्ञानेश्वर मेटे, संजय तांदळे, उमेश बकले, जिवन घोलप यांनी अवघ्या चोवीस तासात दरोडा उघडकीस आणला.
( संपादन : प्रताप अवचार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.